Month: February 2025

आरोग्य

कोल्हापुरात अन्नातून ६०० जणांना विषबाधा….

कोल्हापूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी इथं ग्रामस्थांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली असून बाधित रुग्णांची संख्या 600 च्या पुढे गेली आहे. तात्पुरते रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 420 तर औषधोपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या सुमारे 180 च्या पुढे आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून अनेकांना पोट दुखी , […]Read More

आरोग्य

महाराष्ट्रात GB सिंड्रोमग्रस्त रुग्णांची संख्या 163 वर

महाराष्ट्रात गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे पाच नवीन रुग्ण आढळले आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि इतर भागात त्यांची संख्या 163 पर्यंत वाढली आहे. मृतांचा आकडाही 5 वर पोहोचला आहे. आतापर्यंत देशातील 5 राज्यांमध्ये गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 47 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत आणि 21 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत, तर 47 […]Read More

देश विदेश

अमेरिकेकडून 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची घरवापसी

नवी दिल्ली,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेतील बेकायदा भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. ‘सी-१७’ या अमेरिकन लष्कराच्या विमानातून टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथून २०५ बेकायदा स्थलांतरितांना भारतात परत पाठविले जात असल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. पैकी १०४ भारतीयांना परत पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच महिन्यात अमेरिकेचा […]Read More

देश विदेश

अमेरिकेने समुद्रात उतरवले शक्तिशाली ड्रोनभेदी लेझर शस्त्र

वॉशिग्टन डीसी. दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेने महाशक्तिशाली लेझर शस्त्राचे छायाचित्रे प्रसिद्ध केले आहेत. युद्धनौकेतून ड्रोन नष्ट करणाची ताकद या शस्त्रात आहे. या लेसर शस्त्राचे नाव HELIOS लेझर सिस्टम आहे. हे यूएसएस प्रीबल आर्ले बर्क क्लास डिस्ट्रॉयरमधून डागले जाते. हे शस्त्र विशेषतः ड्रोनच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. अलीकडच्या काळात अमेरिकेच्या […]Read More

ट्रेण्डिंग

वित्तमंत्रालयातील कर्मचाऱ्यांना ChatGPT, DeepSeek वापरण्यास मनाई

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकन संसद आणि काँग्रेसने त्यांच्या कार्यालयात चीनच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) Chatbot DeepSeek च्या वापरावर बंदी घातली आहे. US काँग्रेसने यासंदर्भात नुकतेच एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यानंतर आता भारत सरकारने अर्थ मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयातील उपकरणांवर AI Tools किंवा AI Apps वापरण्यास मनाई केली आहे. यामुळे सरकारी कागदपत्रे […]Read More

अर्थ

केंद्र सरकारने सॉवरेन गोल्ड बाँड योजना

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने सॉवरेन Sovereign Gold Bond Scheme (SGB) बंद केली आहे. गेल्या काही वर्षांत सोन्याच्या किमती वाढल्यामुळे सरकारला ही योजना सुरू ठेवणे कठीण झाले होते. जागतिक बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस २,८०० रुपयांच्या पुढे गेला आहे. भारतातही सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८४,९०० रुपयांवर पोहोचला होता. यामागील […]Read More

विज्ञान

महाराष्ट्र साजरे करणार क्वांटम विज्ञान – तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष !

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्र सरकारच्या माहिती – तंत्रज्ञान विभाग UNESCO सोबत भागीदारी करणार असून 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान – तंत्रज्ञानशी संबंधित आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे केले जाणार असल्याची घोषणा माहिती – तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केली आहे. नॉबेल पारितोषिक विजेत्या जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व्हर्नर हायझेनबर्ग यांनी शोधलेली आधुनिक क्वांटम यांत्रिकीच्या […]Read More

महानगर

मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीत विक्रमी वाढ ; ७,२१७ कोटींचा महसूल

मुंबई दि.5 (एम एमसी न्यूज नेटवर्क):मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये (३१ जानेवारी २०२५ पर्यंत) एकूण ६७.११ दशलक्ष टन मालवाहतूक केली असून, यातून तब्बल ७,२१७.४८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. नागपूर आणि मुंबई विभागांनी या वाढीमध्ये मोठे योगदान दिले आहे. मध्य रेल्वेच्या पाच विभागांपैकी नागपूर विभागाने ३६.८५ दशलक्ष टन मालवाहतूक करत ५५% वाटा उचलला, तर […]Read More

राजकीय

‘मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोहोचविणार’..!

बीड, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आष्टी, बीड येथे ‘आष्टी उपसा सिंचन योजना क्र. 3 अंतर्गत येणार्‍या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी केली, तसेच त्यांच्या हस्ते बोगदा कामाचा शुभारंभ’ करण्यात आला. यावेळी तेथे उपस्थितांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधित केले. याप्रसंगी, बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, 2014 साली पहिल्या कार्यकाळात […]Read More

पर्यटन

तवांग – अरुणाचल प्रदेशातील भव्य मॉनेस्ट्री आणि निसर्गसौंदर्य

भारताच्या ईशान्य भागातील अरुणाचल प्रदेश हे एक निसर्गरम्य आणि अनोखी संस्कृती असलेले राज्य आहे. त्यातील तवांग हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे, कारण इथे भारतातील सर्वात मोठ्या मॉनेस्ट्रींपैकी एक आहे आणि तेथील निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे. तवांग हिमालयाच्या कुशीत वसलेले एक सुंदर पर्यटनस्थळ आहे, जिथे बौद्ध परंपरा आणि निसर्ग यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. तवांगचे ऐतिहासिक आणि […]Read More