मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सुरक्षित भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून ‘बालरक्षा अभियान’ आणि ‘बालस्नेही पुरस्कार’ हे दोन उपक्रम राबवले जाणार आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पालक, शिक्षक, पोलिस, सामाजिक संस्था आणि प्रशासन यांच्यात संपर्क, समन्वय आणि जबाबदारीची जाणीव वाढवणे गरजेचे असून त्यादृष्टीने […]Read More
छ. संभाजीनगर दि १२ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : 44वे मराठवाडा साहित्य संमेलन 15 , 16 फेब्रुवारी रोजी वाळूज येथे दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. यंदाच्या संमेलनात पहिल्यांदाच संविधानावर ग्रंथ म्हणून चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याची माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. संविधानावर निवडणुकांदरम्यान झालेल्या उलटसुलट चर्चांमुळे त्याचे […]Read More
कोल्हापूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूरच्या शाहू मार्केटयार्ड मधे, आज हापूस आंब्याची पहिली आवक झाली. फळांचा राजा अशी ओळख असणाऱ्या हापूस आंब्याचा पहिला लिलाव शाहू मार्केट यार्ड मधे आज पार पडला. पहिल्या लिलावात आंब्याला उच्चांकी दर मिळाला. सव्वा डझन आंबे असणाऱ्या पेटीला प्रसाद वळंजू यांनी 15 हजार 121 रुपयांची बोली लावली. एका हापूस […]Read More
जालना दि १२:– वेबसाईट मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जालन्यात सीसीआय केंद्राची कापूस खरेदी बंद झाली. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्र देऊन पुढील आदेश होईपर्यंत कापूस खरेदी बंद असेल असं कळवलं आहे. त्यामुळे, जो पर्यंत सीसीआय कापूस खरेदी केंद्राची वेबसाईट सुरू होत नाही, […]Read More
वाशीम, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज चिया बी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला असून मुहूर्तालाच खरेदी झालेल्या चिया बी ला उच्चांकी २३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळालाय त्यामुळं शेतकऱ्याला आनंद झाला आहे. वाशीम जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात याची पेरणी झाली आहे मात्र वाशिम जिल्ह्यात बाजारपेठ उपलब्ध नसल्याने […]Read More
ठाणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी रंगभूमी वर बर्याच एकांकिकां स्पर्धा होत असतात. त्यातल्या कित्येक स्पर्धा आंतर महाविद्यालयीन किंवा खुल्या असतात. ह्या स्पर्धांमध्ये तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह दिसून येतो. फार क्वचितच कधीतरी 50 वयाच्या पुढचे कलाकार दिसून येतात. पण तसं पाहायला गेलं हाच वयोगट सर्वात जास्त अनुभवी असतो. खास ह्याच 50 आणि त्यापेक्षा […]Read More
अयोध्या,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना लखनौ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. सत्येंद्र दास यांनी अनेक वर्षे राम मंदिरात सेवा केली होती. त्यांचा समर्पित स्वभाव आणि धार्मिक कार्यातील योगदान […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय चौकाचे’ उद्घाटन करण्यात आले. मुंबईतील टाटा गार्डन नजिक, भुलाबाई देसाई रोडवर, धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गाजवळ हा चौक उभारण्यात आला आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि […]Read More
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तत्कालीन शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी घेतलेला मोठा निर्णय सरकारने रद्द केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांची पटसंख्या दहा किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा ठिकाणी कंत्राटी शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला होता. अखेर कंत्राटी शिक्षक भरती रद्द करण्यात आला […]Read More
डोंबिवली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे भाषाप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखील मराठीचा वापर वाढल्याचे दिसत आहे. मराठी भाषिक प्रदेशात राहत असल्यामुळे परदेशातील नागरिकांना आपल्या भाषेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांना मराठी भाषा शिकण्याची इच्छा होत आहे. मात्र अजूनही ज्यांना आपली भाषा पुन्हा एकदा पद्धतशीरपणे शिकून घ्यायची […]Read More