Month: February 2025

महानगर

” उन्नत पॉडकार ” ही भविष्यातील नाविन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ….

वडोदरा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात ” उन्नत पॉडकार ” वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल! असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंडेड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक […]Read More

Uncategorized

काटेपूर्णा नदीचे पात्र पडले कोरडे; शेतकऱ्यांनी व्यक्त केली चिंता.

वाशिम, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्यातील काटा या गावातून उगम होणारी आणि जिल्ह्याची प्राणहिता म्हणून ओळख असलेल्या काटेपूर्णा नदीचे पात्र फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच कोरडे पडले आहे. पैनगंगा नदीची उपनदी असणारी काटेपूर्णा नदी ही वाशीम आणि अकोला जिल्ह्यातून वाहते. दोन्हीही जिल्ह्यातील बहुतांश कृषी क्षेत्र हे काटेपूर्णा नदीमुळे सिंचनाखाली आले असून मागील काही वर्षांपासून […]Read More

महानगर

नवी मुंबई परिवहनमधील कंत्राटी कामगारांना मिळणार वेतनवाढ

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई परिवहन सेवेमध्ये कार्यरत विविध संवर्गामधील कंत्राटी, ठोक, रोजंदारी, सहा महिने नियुक्ती, करार पद्धत तत्वावरील कामगारांची वेतनवाढ आणि त्यांच्या अन्य सुविधांबाबतचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. कामगार मंत्र्यांनी याबाबत तसे आदेश दिले आहेत. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर श्रमिक सेनेने मागणी केल्यानुसार श्रमिक सेनेचे अध्यक्ष […]Read More

मराठवाडा

मानवी साखळीतून अवतरले छत्रपती शिवराय …

परभणी, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जि प प्रशाला शाळेच्या मैदानावर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मानवी साखळीद्वारे भव्यदिव्य अशी प्रतिकृती प्रशालेच्या प्रांगणात साकारण्यात आली. गावातील जि.प.प्रशाला ,केंद्रीय प्राथमिक शाळा,प्राथमिक ऊर्दू शाळा,कन्या शाळा, संत तुकाराम ऊर्दू माध्यमिक शाळा,स्कॉलर इंग्लिश स्कूल अंगणवाडी असे एकूण तब्बल ९९५ […]Read More

ऍग्रो

जालन्यात आंब्याच्या झाडांना फुटला मोहर, चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा…

जालना, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जालन्यात आंब्याच्या झाडांना मोहर फुटलाय. त्यामळे आंबा उत्पादक शेतकरी आनंदित झाले असून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आंब्याला मुबलक पाणी आणि फळ धरणेसाठी पोषक परिस्थिती असल्याने यंदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा लागून राहिली आहे. आंब्याच्या झाडांना यंदा मोठ्या प्रमाणात मोहर फुटला असून आंब्यांच्या उत्पन्नात यंदा वाढ होण्याची […]Read More

कोकण

राजकोट किल्ल्यावरील पायाभरणीला 19 फेब्रुवारी पासून सुरुवात

सिंधुदुर्ग, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या पायाभरणीचा 19 फेब्रुवारी हा शिवजयंती दिनी शुभारंभ होणार आहे .हा पूर्णाकृती योद्ध्याच्या वेषभूषेतील ६० फुटी पुतळा येथे उभारण्यात येत आहे. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन नवीन पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टील मध्ये बनवण्यात येत आहे. […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यातील सदनिकेत आढळल्या तब्बल ३०० मांजरी, पोलिसांची कारवाई

पुणे, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील हडपसर भागातील मार्वल बाऊण्टी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या सोसायटीतील सी-901 या 3 BHK फ्लॅटमध्ये रिंकू भारद्वाज आणि रितू भारद्वाज या बहिणींनी 300 हून अधिक मांजरी पाळल्याची बाब समोर आली आहे. सदर सभासदाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मांजरी का पाळल्या? हे अद्याप स्पष्ट झाले […]Read More

अर्थ

Reliance चे Jio-Coin डिजिटल चलन

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या सर्वत्र जिओ क्वाईनची चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपासून रिलायन्स जिओ क्वाईन ‘हॉट टॉपिक’ बनला आहे. काही तज्ज्ञांकडून एक टोकनची किंमत 0.50 डॉलर (जवळपास 43.30 रुपये) असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिओ क्वाईन हे डिजिटल चलन आहे. इथरियम किंवा बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीऐवजी रिलायन्स जिओचे हे नाणे […]Read More

अर्थ

अमेरिकेकडून भारताला मिळणारा १८२ कोटींचा निधी रद्द

वॉशिग्टन डीसी, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी एलॉन मस्क यांनी भारतातील निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा १८२ कोटी रुपयांचा निधी रद्द केला आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाने (DOGE) शनिवारी हा निर्णय घेतला. DOGE ने X वर पोस्ट करून एक यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये विभागाने रद्द केलेले […]Read More

देश विदेश

प्रयागराज रेल्वेस्थानक २६ फेब्रुवारीपर्यंत बंद

प्रयागराज, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पर्वणीला आता शेवटचे १० दिवस बाकी आहेत. १३ जानेवारीपासून सुरु झालेल्या या महाकुंभाला दररोज लाखोंच्या संख्येने हजेरी लावत आहेत. प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन करताना प्रशासनाची तारांबळ उडत आहे. काही दिवसांपूर्वीच अमृतस्नानादरम्यान झालेल्या धावपळीत चेंगराचेंगरी झाल्याने ३० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी […]Read More