Month: February 2025

ट्रेण्डिंग

भुसावळहून कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या १२ ट्रेन रद्द

भुसावळ, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याची पर्वणी साधण्यासाठी आता अवघा आठवड्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजकडे गर्दी करत आहेत. अती गर्दीचे नियोजन अयशस्वी ठरल्याने चेंगराचेगरीच्या घटना घडल्यामुळे आधीच काही भाविकांच्या मृत्यू झाला आहे.त्यामुळे आता प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रयागराज येथे सुरु असलेल्या […]Read More

ट्रेण्डिंग

अक्षय कुमारचे ‘चलो महाकाल’ गाणे ठरले वादग्रस्त

उज्जैन, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाशिवरात्रीच्या काही दिवस आधी अभिनेता अक्षय कुमारने आपल्या चित्रपटातील ‘चलो महाकाल…’ हे गीत समाजमाध्यमावर प्रदर्शित केले. या गीतावर महाकाल मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. या अशा प्रकारच्या दृश्यांमुळे सनातन धर्माची प्रतिमा मलीन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांच्या या आक्षेपांमुळे अक्षयचे हे गाणे चांगलेच अडचणीत […]Read More

Breaking News

शिवजयंतीच्यानिमित्ताने ‘छावा’ची संपूर्ण टीम पोहोचली रायगडावर, विकी कौशलने शेअर केले

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज शिवजयंतीच्यानिमित्ताने ‘छावा’ची संपूर्ण टीम रायगडावर पोहोचली होती. याचे फोटो विकी कौशलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.‘छावा’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधी विकी कौशलने सर्वात आधी रायगडावर जायचंय असं म्हटलं होतं. अखेर विकी आज मराठमोळ्या अंदाजात डोक्यावर फेटा बांधून रायगडावर पोहोचला. त्याच्यासह दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते दिनेश विजन ही सगळी मंडळी […]Read More

मनोरंजन

विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट मराठीत डब होणार

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सगळीकडेच सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. छावा चित्रपटाच्या टिमने प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. छावा आता मराठीतही येणार आहे. सांस्कृतिक मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी नुकतीच ‘छावा’ सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची […]Read More

Breaking News

देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात लवकरच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतात लवकरच इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी आयआयटी मद्रासच्या इलेक्ट्रिक एअरक्राफ्ट स्टार्टअप ईप्लेन कंपनीने एक अब्ज डॉलरचा (जवळपास ८६ अब्ज रुपये) करार केला आहे. त्याअंतर्गत भारतातील आघाडीची हवाई रुग्णवाहिका कंपनी ‘आयसीएटीटी’ला ७८८ एअर ॲम्ब्युलन्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे भविष्यात वैद्यकीय आपत्कालीन […]Read More

Featured

राहुल गांधीकडून घडली घोडचूक! छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजलीऐवजी वाहिली श्रद्धांजली

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा देताना मोठी चूक केली आहे. शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा देताना राहुल गांधी यांनी छत्रपती […]Read More

विदर्भ

तब्बल 18 हजार फुटावर साकारली महाराजांची हरित रांगोळी

अकोला दि १९:– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त अकोला जिल्हयातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात चतुर्भुज आर्ट्सचे रांगोळी कलाकार अनिल काळे आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून तब्बल 18 हजार स्क्वेअर फुटावर गहू आणि मोहरीच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य हरित रांगोळी साकारण्यात आली आहे .ड्रोन कॅमेऱ्यातून दिसणारी ही हरित रांगोळी तब्बल 18 […]Read More

ट्रेण्डिंग

शिवजयंती : छत्रपती पुतळ्यांमध्ये नाही, तर आचरणात हवे, शिवसंस्कार मनात

राधिका अघोर शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप ।शिवरायांचा आठवावा साक्षेप ।भूमंडळी ।।१।। छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वावी जयंती आपण सगळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतभरात आणि जगातही अनेक ठिकाणी साजरी करतो आहोत. आणि पुढेही युगानुयुगे ही शिवजयंती साजरी करणारच आहोत. असा स्वयंभू, पराक्रमी, श्रीमंत योगी, राजा आपल्याला लाभला, हे खरोखरच आपलं भाग्य आहे. […]Read More

राजकीय

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पदांना मान्यता

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या ३४६ पदांना तसेच त्यासाठीच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक […]Read More

महानगर

सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यास मान्यता

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा आयोग १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी शिफारशी करेल. या शिफारशींबाबत अहवाल सादर करण्यास या आयोगाला ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत असेल. […]Read More