Month: January 2025

करिअर

AI मुळे संपुष्टात येणार अनेक नोकऱ्या

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे तंत्रज्ञान आधुनिक युगात झपाट्याने प्रगती करत आहे. यामुळे अनेक उद्योगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामकाज अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पार पडत आहे. मात्र, याचा दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे अनेक नोकऱ्यांवर होणारा परिणाम.AI तंत्रज्ञान मानवी श्रमांची जागा घेत असून, यामुळे अनेक पारंपरिक नोकऱ्या संपुष्टात येण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, […]Read More

महिला

महिला अग्निवीर तुकडी सामील होणार सेनादल दिवस संचलनात

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सशक्तीकरण आणि उत्कृष्टतेचे एक महत्त्वपूर्ण प्रदर्शन म्हणून, अग्निवीर महिला मार्चिंग पथक १५ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे होणाऱ्या आर्मी डे परेड २०२५ मध्ये सहभागी होईल, ज्यामुळे भारतीय सैन्यातील महिलांचा उल्लेखनीय प्रवास आणखी वाढेल. २०२४ च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये ऑल-वुमन ट्राय-सर्व्हिसेस मार्चिंग पथकात त्यांच्या सहभागानंतर हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा […]Read More

क्रीडा

विक्रमी धावसंख्येसह भारतीय महिला क्रिकेट संघाचा आयर्लंडवर ऐतिहासिक विजय

राजकोट, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय संघाने आयर्लंडविरूद्ध मालिकेत ३-० असा निर्भेळ विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ४३५ धावा ऐतिहासिक धावसंख्या उभारली. सर्वात मोठ्या वनडे धावसंख्येनंतर भारताने वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. भारताच्या महिला संघाने संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावे केले […]Read More

ट्रेण्डिंग

कंगनाच्या Emergency वर बांगलादेशात बंदी

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूडची अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. दरम्यान, या चित्रपटावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे. ‘इमर्जन्सी’ची कथा १९७५ मध्ये भारतात लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. आयएएनएसच्या अहवालानुसार, कंगना […]Read More

विदर्भ

१० दिवसांतच पाच वाघांचा संशयास्पद मृत्यू

नागपूर, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भातील वनपरिक्षेत्रात जानेवारी महिन्याच्या १० दिवसांतच पाच वाघांचे मृत्यू झाले. तर दोन वाघ बेपत्ता असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर आता वनविभाग सतर्क झाला आहे. मृत्यू झालेल्या वाघांमध्ये सहा महिन्यांच्या दोन बछड्यांसह तीन प्रौढ वाघांचा समावेश आहे. या वाघांचे संशयास्पद मृत्यू अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाबाहेर झाले आहेत. तसेच, […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

देशमुख, राऊतांना ईडी लावता, मग कराडला का नाही?

पुणे दि १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड आणि परभणीमध्ये जे काही झालं आहे, त्यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी उत्तर दिले पाहिजे. गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांनाच यासंबंधी प्रश्न विचारले जातील. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला पाहिजे होता. अनेक नेत्यांवर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन नेत्यांवर ऐकीव […]Read More

ट्रेण्डिंग

भारताची वाटचाल सागरी शक्तीच्या दिशेने

मुंबई,दि.१५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नीलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर […]Read More

महानगर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला कुंपण घालण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बोरिवली येथील नॅशनल पार्क अर्थात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बेकायदा बांधकामावरून हायकोर्टाने राज्य सरकारचे वाभाडे काढले. १९८७ मध्ये आदेश देऊनही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाभोवती कुंपण का नाही घातले नाही? सरकारच्या नाकर्तेपणामुळेच या उद्यानात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत.आता भविष्यात तरी याठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी राहू नयेत यासाठी येथे […]Read More

मराठवाडा

मोक्का लावलेल्या वाल्मीक कराडला सुनावली सात दिवसांची पोलीस कोठडी

बीड, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने ताबा घेतलेल्या वाल्मिक कराडला बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी हे आदेश दिले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल गुन्ह्यात मकोका लावण्यात आलेला आहे. या प्रकरणात मंगळवारी सीआयडीने वाल्मिक कराडचा ताबा मागितला होता. वाल्मिक […]Read More

देश विदेश

अॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राचा 4.32 कोटी रुपयांना

प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी अॅपलचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेलं एक ऐतिहासिक पत्र नुकतंच एका लिलावात 4.32 कोटी रुपयांना विकलं गेलं आहे. या पत्राला तंत्रज्ञान क्षेत्रात आणि जॉब्सच्या चाहत्यांमध्ये खूप महत्त्व आहे. हे पत्र स्टीव्ह जॉब्सने आपल्या व्यक्तिगत जीवनातील विचार आणि तत्त्वज्ञान मांडण्यासाठी लिहिलं होतं. त्यामध्ये त्यांनी त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी, कार्यप्रणाली आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याविषयीचे विचार […]Read More