Month: January 2025

ट्रेण्डिंग

Coldplay concert ला लहान मुलांना नेण्यास बंदी

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क): १८ ते २१ जानेवारी दरम्यान नवी मुंबईत प्रथमच जागतिक कीर्तीच्या ‘कोल्डप्ले’ concert चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असून जागतिक कीर्तीच्या कलावंतांचा सहभाग या कार्यक्रमात असणार आहे. या संगीत कार्यक्रमाला लहान मुलांना घेऊन जाण्यावर जिल्हा बालसंरक्षण विभागाकडून बंदी घालण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी […]Read More

देश विदेश

8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी, होतील असे फायदे

8 व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. 8 व्या वेतना आयोगाची स्थापन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. याआधी 2016 साली 7 वा वेतन आयोग मंजूर झाला होता. त्यानुसार, 2026 मध्ये 8 वा वेतन आयोग लागू होईल. मात्र, 2025 मध्ये 8 वा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

भरधाव कंटेनरने 15 गाड्यांना दिली धडक, चाकण शिक्रापूर रस्त्यावरील थरार

चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव कंटेनरकडून दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिल्याची घटना बुधवारी घडली आहे. ही ध़डक इतकी जोरदार होती की यात त्या गाड्यांचा चुराडा झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सुरूवातीला कंटेनर चालकाने चाकणमधील माणिक चौकात तीन महिलांना उडवले. त्यानंतर पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनी पाठलाग सुरु केल्याचे पाहून […]Read More

Uncategorized

स्थानिकांचा नकार , यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्याच्या आशा मावळल्या.

सांगली दि १६– आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. देवराष्ट्रे या गावात त्यांचा जन्म झाला. विटा , कराड, सातारा आणि मुंबई , नंतर दिल्ली येथे त्यांचे वास्तव्य राहिले. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट्रे या जन्म गावी स्मारक व्हावे असा प्रयत्न गेले अनेक वर्षे सुरू आहे. पण स्थानिक […]Read More

Featured

ज्वलज्वलंतेजस छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक: स्वराज्यासाठी धर्म रक्षणाचा क्षण

मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) : प्रत्येक मराठी, मराठीच काय, देशातला, स्वराज्याची आस असणारी प्रत्येक व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानते, दैवत मानते. परकीय आक्रमकांच्या अत्याचाराच्या तमोयुगातून महाराष्ट्राला मुक्त करत, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आदर्श राजे म्हणून शिवरायांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. मात्र , छत्रपतींच्या नंतर, स्वराज्यावर आलेल्या संकटांचा समर्थपणे सामना करत, महाराष्ट्र धर्म […]Read More

महानगर

अभिनेता सैफ अली खान वर चाकू हल्ला, सहा जखमा, शस्त्रक्रिया

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू आहे. सैफला रात्री 3.30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी सांगतात की, सैफवर सहा […]Read More

महानगर

राम शिंदे यांची जपानच्या महावाणिज्यदूतांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जपानचे भारतातील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी आज विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सभापती पदी निवड झाल्याबद्दल कोजी यांनी प्रा. शिंदे यांचे अभिनंदन केले.सभापती प्रा. राम शिंदे यांनी महावाणिज्यदूत कोजी यांचे स्वागत केले. यावेळी विधिमंडळाचे सचिव (कार्यभार 2) विलास आठवले उपस्थित होते. जपान भारत यांचे […]Read More

महानगर

कर्नाक पुलाच्या तुळई सरकविण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क): मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील आणि पी. डि’मेलो मार्गाला जोडणाऱ्या १५४ वर्षे जुन्या कर्नाक पुलाच्या पुनर्बांधणीचा महत्त्वाचा टप्पा बृहन्मुंबई महानगरपालिकेने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या अंतर्गत ५५० मेट्रिक टन वजनाची उत्तर बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) मंगळवार, १४ जानेवारी २०२५ रोजी ९.३० मीटर सरकविण्याची कार्यवाही यशस्वीपणे पार पडली. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा […]Read More

पर्यटन

दुबई – लक्झरी, वास्तुकला, आणि सांस्कृतिक अनुभवाचा आदर्श

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दुबई हे जगातील सर्वाधिक आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे, जिथे भव्य वास्तुकलेपासून वाळवंटाच्या साहसापर्यंत सर्व काही अनुभवता येते. आधुनिकता आणि पारंपरिक अरब संस्कृतीचा संगम दुबईला अनोखं बनवतो. प्रवासाची सुरुवात बुर्ज खलिफा पासून करा, जी जगातील सर्वात उंच इमारत आहे. तिच्या टॉप डेकवरून शहराचा विहंगम नजारा अविस्मरणीय असतो. त्यानंतर दुबई मॉलला […]Read More

विदर्भ

नागपूर रेल्वे स्थानकाचे ऐतिहासिक शतक

मुंबई दि.15(एम एमसी न्यूज नेटवर्क): नागपूर रेल्वे स्थानक, भारतीय रेल्वेचे एक प्रमुख केंद्र आणि वारशाचे प्रतीक, आपल्या सेवा क्षेत्रात 100 गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे. हे स्थानक 15 जानेवारी 1925 रोजी तत्कालीन मध्य प्रांतांचे राज्यपाल सर फ्रॅंक स्लाय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून हे स्थानक भारताच्या रेल्वे जाळ्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उभे आहे, […]Read More