Month: January 2025

मराठवाडा

वाल्मिक कराडला मिळाली न्यायालयीन कोठडी

बीड, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हत्येचा कट रचल्याचा आरोपाखाली एसआयटी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला बीडच्या विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली होती. त्यामुळे एसआयटीने आज त्याला न्यायालयात हजर केले. (Sit) एसआयटीनेच न्यायालयाकडे एमसीआर मागीतल्याने विशेष […]Read More

महानगर

डाक विभागाच्या तिकीट प्रदर्शनाचे राज्यपालांनी केले उद्घाटन

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचे (महापेक्स २०२५) उदघाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नाशिक येथील पांडव लेणी वरील स्थायी सचित्र विरूपण प्रकाशित करण्यात आले, तसेच मूलचंद जी शाह यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज्ड […]Read More

मराठवाडा

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मोसंबीची आवक वाढली…

जालना, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मोसंबीची आवक वाढली आहे. मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून जालना जिल्हा ओळखला जातो. मात्र, या जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या मोसंबीच्या घसरलेल्या भावामुळे चिंतीत पडलेले आहेत. थंडीमुळे मोसंबीला 300 रूपयांपासून ते 1 हजार 450 रूपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. जालना बाजार समितीत एकूण सरासरी […]Read More

राजकीय

पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार 6,25,457 कोटींवर

दावोस, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]Read More

विदर्भ

संक्रातीच्या सुगड्यांचा उपयोग वृक्ष वाचविण्यासाठी

वाशिम, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मकर संक्रांतीत महिलांनी वापर केलेल्या सुगड्यांचा(मातीच्या भांड्याचा) वापर वृक्ष संवर्धनासाठी अनोख्या पद्धतीने उपयोग करून सामाजिक संदेश देण्याचा उपक्रम वाशीमच्या एस एम सी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थी यांनी हाती घेतला आहे. झाडांना सलाईन पद्धतीने पाणीपुरवठा करत संगोपन करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात सुगड्यांना झाडांच्या बुडात पुरून त्यात छिद्र पाडले […]Read More

खान्देश

लष्कराच्या तोफखान्याचे धडकी भरवणारे शक्ती प्रदर्शन

नाशिक दि २१– युद्धाचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय लष्कराच्या तोफखाना दलाच्या विविध तोफांनी आज नाशिकच्या देवळीक यांच्या फायरिंग रेंजमध्ये विविध लक्ष्यावर अचूक निशाणा साधत शत्रूच्या वरात धडकी भरविणाऱ्या भारतीय लष्कराच्या शक्तीचे प्रदर्शन घडविले. भारतीय सैन्य दलातील महत्त्वाचा भाग असलेला युद्धाचा देव अर्थात तोफखाना दलाचे प्रात्यक्षिके आज नाशिक मधील देवळाली फायरिंग रेंजमध्ये झाली. अतिविशिष्ट सेवा […]Read More

राजकीय

रोजगार नियमनासाठी सरकार आणणार नवा कायदा

मुंबई दि २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खासगी क्षेत्रातील उद्योग कंपन्यांना खबरदारीचा इशारा देणारी ही बातमी आहे. तुमच्याकडे बेरोजगारांना देण्यासाठी मुबलक रोजगार उपलब्ध असतानाही तुम्ही ही माहिती सरकारपासून लपवून ठेवल्यास संबंधित कंपनीकडून ५० हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. राज्याच्या कौशल्य, रोजगार , उद्योजकता विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रोजगार पुरविणाऱ्या खासगी कंपन्यांवर […]Read More

बिझनेस

दावोसमध्ये गुंतवणुकीचा श्रीगणेशा, लाखों कोटींचे करार

दावोस, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वित्झर्लंडच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीतून महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील उद्योग गुंतवणुकीचा श्री गणेशा झाला असून पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी करण्यात आला आहे. त्यानुसार कल्याणी उद्योग समूह गडचिरोलीत तब्बल ५ हजार २०० कोटींची गुंतवणूक करून मोठा पोलाद प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून सुमारे […]Read More

ऍग्रो

संत्रवर्गीय फळांच्या नुकसान भरपाईसाठी १५६ कोटी रु. मंजुर

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारने जुलै ते ऑगस्ट २०२४ मधील चार जिल्ह्यात झालेल्या संत्रावर्गीय फळ पिकांच्या नुकसान मदतीसाठी १६५ कोटींच्या निधीला मंजूरी दिली आहे. यामध्ये नागपूर विभागातील वर्धा आणि अमरावती विभागातील अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने या मदतीचा शासन निर्णय आज प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे […]Read More

राजकीय

पंतप्रधान मोदी घेणार महाकुंभमेळ्याचा अनुभव

प्रयागराज, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ५ फेब्रुवारीला महाकुंभ मेळ्याला जाणार आहेत. यावेळी ते प्रयागराज येथे महाकुंभमध्ये अमृतस्नान करणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यात संगम परिसर आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रशासनाने सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गृहमंत्री अमित शहा २७ […]Read More