Month: January 2025

राजकीय

आपली बंद दाराआड झालेली चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत नाही…

कोल्हापूर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपण बंद खोलीत चर्चा केली, ती राष्ट्रवादी पक्षाबाबत नव्हे तर एका प्रकल्पाबाबत केली असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले. नवीन सहकार मंत्र्यांना आपल्याशी दोन-तीन विषयावर बोलायचे होते, त्यामुळेच त्या कार्यक्रमात खुर्चीची अदलाबदल केली असेही […]Read More

Featured

राष्ट्रीय बालिका दिन : शक्तिरूप स्त्रीने स्वतः चे सामर्थ्य ओळखावे

मुंबई, दि. 24 (राधिका अघोर) :24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. वर्षांनुवर्षे बालिकांना जगात अनेक ठिकाणी दुय्यम स्थान दिले गेले, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करावा लागला. त्यांना सामान हक्क आणि संधी मिळावी, याबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. विविध उपक्रम राबवले जातात. तसं तर आजच्या आधुनिक जगात महिलांना […]Read More

Uncategorized

मेक्सिकन टाकोस: एक झटपट आणि चवदार मेक्सिकन पदार्थ

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मेक्सिकन टाकोस हे संपूर्ण जगभर लोकप्रिय असलेले एक चवदार स्नॅक आहे. कुरकुरीत टॉर्टिया, मसालेदार फिलिंग, आणि स्वादिष्ट सॉस यांच्या अप्रतिम मिश्रणाने ही डिश खवय्यांची पहिली पसंती बनली आहे. टाकोस घरच्या घरी तयार करणे खूप सोपे आहे. चला, ही रेसिपी पाहूया! साहित्य कृती शेवट मेक्सिकन टाकोस तयार आहेत! घरी सोप्या […]Read More

खान्देश

मोडाळे ग्रामपंचायतीला मिळाला पंचायतराज विकास पुरस्कार…

नाशिक, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र शासनाच्या पंचायत राज विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या पंचायत राज पुरस्कारांतर्गत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मोडाळे या ग्रामपंचायतींला पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायतराज विकास पुरस्कार अंतर्गत स्वच्छ तथा हरित गाव या संकल्पनेकरिता पुरस्कार मिळाला आहे, ११ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. […]Read More

ट्रेण्डिंग

रशियन सैन्यात भरती झालेले 16 भारतीय बेपत्ता

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशियन सैन्यात भरती होऊन युक्रेन युद्धात सामील झालेल्या 16 भारतीय नागरिकांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे समोर आले आहे. तर या युद्धात आतापर्यंत 12 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (MEA) दिली. केरळचा रहिवासी असलेल्या बिनील बाबू या भारतीय व्यक्तीचा युक्रेनमधील संघर्षात मृत्यू झाला आहे. तर जैन […]Read More

राजकीय

शिवाजी महाराजांच्या वंशजांना सरंजाम जमिनीवरील सूट कायम…

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजीमहाराजांच्या राजघराण्यातील वंशज असलेल्या कुटुंबीयांची उपजीविका त्यांच्या दर्जानुसार चालावी म्हणून भोसले घराण्याच्या मालकीच्या खाजगी जमिनी तसेच इतर मालमत्तांवरील सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना तहहयात लिनियल ठेवण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. “द बॉम्बे सरंजाम जहांगीर आणि इतर इनाम जमिनी कायदा १९५२ च्या नियमानुसार भोसले राजघराण्याच्या […]Read More

आरोग्य

ठाण्यामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव

ठाणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यातील कोपरी परिसरात बर्ड फ्लूची लागण सुरु झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोपरी परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा १४ जानेवारीला मृत्यू झाला होता. कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून ठाणे महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोपरीमधील चिकन आणि मटणाची दुकाने […]Read More

पर्यटन

भूटान: एक स्वर्गीय प्रवासाचा अनुभव

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भूटान, हिमालयाच्या कुशीत विसावलेला एक छोटासा देश, जिथे सौंदर्य, शांतता आणि अध्यात्मिकता यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. “थंडर ड्रॅगनचा देश” म्हणून प्रसिद्ध असलेला भूटान हा प्रवासासाठी योग्य स्थळ आहे. निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या या देशात वेगवेगळ्या संस्कृती, हिरवाई, पर्वतराजी आणि प्राचीन बौद्ध मठांचे दर्शन होते. भूतानची खास वैशिष्ट्ये भूटान […]Read More

देश विदेश

डाबर इंडिया आणि पतंजली आयुर्वेद न्यायालयात आमनेसामने

नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत पाय रोवून उभी असलेली, आयुर्वेदीक औषधे निर्मिती कंपनी डाबर इंडिया आणि गेल्या काही वर्षांत उद्यास आलेली पतंजली आयुर्वेद ही कंपनी आता न्यायालयात एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. डाबर इंडिया आणि पतंजली आयुर्वेद च्यवनप्राशच्या जाहिरातीवरून कायदेशीर लढाईसाठी दिल्ली न्यायालयात पोहचले आहेत. डाबरने दावा केला आहे […]Read More

देश विदेश

कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा अग्नितांडव

लॉस एन्जलीस, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात गेल्या काही दिवसांपासून लागलेल्या आगीने कालपासून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा वणवा विझवणेही कठीण झाले आहे. कॅलिफोर्नियाच्या प्रशासनाने काल पन्नास हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. लॉस एंजिलसच्या उत्तरेकडील डोंगरांवर ही आग झपाट्याने पसरली. त्यातच या भागात जोरदार वारे […]Read More