Month: January 2025

पर्यटन

मुरुड-जंजिरा किल्ला

मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा किल्ला हा स्थापत्यकलेचा आणि समुद्राच्या ताकदीचा अद्वितीय नमुना आहे. समुद्राच्या मध्यभागी वसलेला हा किल्ला “अभेद्य जलदुर्ग” म्हणून ओळखला जातो. इतिहास, वास्तुकला, आणि भव्यतेसाठी प्रसिद्ध असलेला हा किल्ला पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. इतिहास वास्तुकला आणि रचना किल्ल्याचे विशेष आकर्षण किल्ल्याला भेट कशी द्यावी? सर्वोत्तम वेळ भेट […]Read More

देश विदेश

या आशियाई देशात समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता

बँकाॅक, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेसारख्या व्यक्तीस्वातंत्रवादी देशात नवनियुक्त पंतप्रधान ट्रम्प यांनी जगात फक्त दोनच लिंग आहेत.’ असे वक्तव्य केले असतानाच आशिया खंडातील एका देशाने धाडसी निर्णय घेतला आहे. पूर्व आशियाई देश थायलंडमध्ये कालपासून समलिंगी विवाह कायदेशीर झाला आहे. यानंतर अनेक समलिंगी जोडप्यांनी विवाह नोंदणी केली. एएफपी न्यूज एजन्सीनुसार, थायलंड हा तैवान आणि […]Read More

महिला

लाडक्या बहिणींना जानेवारीचाही हप्ता मिळण्यास सुरुवात

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लाडकी बहीण योजनेचा फायदा अपात्र महिलांनीही घेतल्याचे आढळून आल्यानंतर या योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? असा संभ्रम निर्माण झाला असतानाच राज्यसरकारने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पाळला आहे. पात्र महिलांच्या खात्यात आज शुक्रवारपासून जानेवारीच्या हप्त्याचे १५०० रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. लाडकी बहिण योजनेचा लाभ अपात्र […]Read More

आरोग्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधी मदत प्रक्रिया होणार पूर्णतः पेपरलेस

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता राज्य शासनाद्वारे कार्यान्वित मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सुलभ आणि पेपरलेस होत आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस करण्यात येणार असून या प्रक्रियेसाठी मंत्रालयात येण्याची […]Read More

शिक्षण

भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात

मुंबई दि २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “विकसित भारत २०४७” मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताची $५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. त्यामुळे महाराष्ट्र भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे महाराष्ट्राचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी जाहीर केले. जागतिक शिक्षण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना मंत्री […]Read More

शिक्षण

एन.डी.स्टुडीओत प्रजासत्ताक दिनी विद्यार्थांचा कलाविष्कार

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्जत येथील एन. डी स्टुडीओ येथे या प्रजासत्ताक दिनी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सुरू केलेला हा उपक्रम महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे. […]Read More

राजकीय

येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर 23 टक्क्यांनी कमी होणार

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेमुळे पुढील दोन वर्षांत कार्यरत होणा-या सौर उर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार असून घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक यांनाही मोठा फायदा होणार आहे. सौर उर्जा प्रकल्पांमुळे आगामी पांच वर्षांत 100 युनिट पर्यंत वीज वापर असणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठीचे वीज दर 5 रु. 87 […]Read More

राजकीय

एसटीचा प्रवास ३ रुपयांनी महागला !

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वसामान्य प्रवाशांना दूरपर्यंतच्या ठिकाणांवर सुरक्षित पोहचवणाऱ्या लाल परीची अर्थात एसटी बसची शुक्रवारपासून ३ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने सादर केलेल्या एसटी दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. एसटी महामंडळ प्राधिकरणाची गुरुवारी […]Read More

मराठवाडा

बीडच्या शेतकऱ्याची केळी इराणला पोहोचली

बीड, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांनी ठरवले तर काय करू शकतात हे या यशोगथेतून समजते.  दुष्काळी ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी नवनवीन उपक्रम राबवत आहेत. त्यातून त्यांना भरघोस उत्पन्नाची हमी मिळत आहे. आष्टी तालुक्यातील भातोडी येथील युवा शेतकरी शंकर रामदास गिते यांनी कमी कालावधीचे असलेले केळी हे पीक घेऊन थेट इराणला पाठवले आहे. […]Read More

विदर्भ

आयुध निर्माण कारखान्यात स्फोट, आठ ठार, सात गंभीर जखमी

भंडारा, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क ) : भंडारा जिल्ह्यात शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात आज सकाळी झालेल्या स्फोटात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण जखमी झाले आहेत. आणखी काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचावकार्यासाठी एसडीआरएफ तसंच नागपूर महानगरपालिकेचा चमू दाखल झाला आहे. संरक्षण दलासोबतच जिल्हा प्रशासनही समन्वयानं मदतकार्यात सहभागी झालं आहे, […]Read More