नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता आणण्यासाठी व पीकवैविध्य राखण्याची खबरदारी घेण्यासाठी, किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभावाने तूर, उडीद आणि मसूर खरेदी करण्यास केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तथा ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. नवी दिल्लीत कृषीभवन येथे विविध राज्यांच्या कृषिमंत्र्यांसोबत दूरदृश्य […]Read More
नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET परीक्षेच्या निकालात झालेल्या गैरप्रकारामुळे देशभरातील विद्यार्थीवर्ग त्रस्त झाला होता. त्यानंतर आता राष्ट्रीय चाचणी संस्थेद्वारे (National Testing Agency – NTA) घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील उच्च शिक्षण विभागाने सात तज्ञांचा सहभाग असलेली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली […]Read More
नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्यालयात उशीरा पोहोचणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी केंद्राच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने आता नवे निर्देश काढले आहेत. देशभरातील केंद्र सरकारच्या कार्यालयातील सर्व ज्येष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी ९.१५ पर्यंत कार्यालयात हजर व्हावे आणि बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावावी, असे आदेश देण्यात आले आहेत. जर निहित वेळेत कर्मचारी […]Read More
वाराणसी, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणारे आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित (86) यांचं आज सकाळी वाराणसी येथे निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील आहेत. परंतु त्यांच्या अनेक पिढ्या काशी येथे वास्तव्यास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 22 […]Read More
मॉस्को, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशिया आणि युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियन सैन्याने सुमारे 200 भारतीय नागरिकांना सैन्यात भरती करून घेतले आहे. या युद्धात 4 भारतीय नागरिक मारले गेले आहेत. यावरून मोदी सरकारने कडक पाऊल उचलले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी भारताने रशियन सैन्याला भारतीय नागरिकांची भरती करू नये. आम्ही भरतीवर सत्यापित […]Read More
मुंबई, दि. २२(एमएमसी न्यूज नेटवर्क): व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया संगणकाधारित आणि केंद्रीय पद्धतीने राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. हीच पद्धत नंतर केंद्र सरकारने स्वीकारली आहे. ही पद्धत पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. त्यामुळे विद्यार्थी तसेच पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी […]Read More
मुंबई दि.22(एम एमसी न्यूज नेटवर्क): ओबीसी आरक्षणाला धक्का लागु नये या मागणीसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा सुरुवाती पासुन पाठिंबा असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जाहिर केले. एस.सी.,एस.टी.,ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करुन आरक्षण द्यावे ही रिपब्लिकन […]Read More
सोलापूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय कृषी संस्कृतीमध्ये प्राण्यांनाही मानाचे स्थान आहे. मात्र यामध्ये कष्ट करणारे गाढव मात्र काही कारणांमुळे नेहमीच दुर्लक्षित राहीले आहे.अवजड ओझी वाहून नेण्याच्या कामामध्ये गाढव खूप उपयोगाचे ठरते. कथांमधून, म्हणींमधूनही बिचारे कष्टाळू गाढव नेहमीच चेष्टेचा विषय ठरते. अशा या दुर्लक्षित गदर्भराजाला सोलापूर जिल्ह्यातील एका गावात मात्र मोठा मान दिला […]Read More
मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवराज अष्टक या चित्रपट मालिकेतून उत्तमोत्तम ऐतिहासिक चित्रपटांचा नजराणा रसिकांसमोर साकार करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता संत मुक्ताईंचे चरित्र मांडणारा चित्रपट घेऊन आले आहेत. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा त्यांचा नवीन चित्रपट येत्या 2 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची प्रस्तुती ए. ए. फिल्म्स ही नामांकित वितरण […]Read More
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील रविंद्र वायकर यांच्या संशयास्पद पद्धतीने निवडणूक जिंकण्याचे प्रकरण आता उच्च न्यायालयात पोहोचले असून याच मतदारसंघातून निवडणूक लढविणारे एक उमेदवार भरत खिमजी शाह यांनी मुंबई उच्च न्यायालयात आज ॲड असीम सरोदे आणि इतरांच्या साहाय्याने याचिका दाखल करून दि. ०४/०६/२०२४ रोजी झालेली मतमोजणी आणि जाहीर […]Read More