Month: February 2024

मराठवाडा

रास्ता रोको प्रकरणी मनोज जरांगे यांच्यावर दोन गुन्हे दाखल

बीड, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या वरती बीडच्या शिरूर पोलीस स्टेशन आणि अमळनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे कलम 341,143,145,149,188,135 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाची मागणी घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून उपोषण करत आहेत मात्र जरांगे […]Read More

मराठवाडा

मराठवाड्यात काँग्रेसला आणखी खिंडार, बसवराज पाटलांचा राजीनामा

लातूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर आता मराठवाड्यात पक्षाला आणखी एक खिंडार पडले आहे. काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले माजी मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील (Basavraj Patil) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बसवराज पाटील यांनी सोमवारी आपल्या काँग्रेस (Congress) सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते येत्या दोन […]Read More

सांस्कृतिक

ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचं अनावरण

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाटक, मालिका आणि चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे होय. नयना आपटे यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.‘पद्मश्री’ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या सिनेकारकीर्दीला ७० वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधत ‘अमृतनयना’ […]Read More

ट्रेण्डिंग

अंबानी पुत्राच्या प्री वेडिंग कार्यक्रमात ६५ शेफ बनवणार २५०० पदार्थ

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरु आहे. लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत त्याची प्रेयसी राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. गेल्यावर्षी अनंत व राधिकाचा साखरपुडा पार पडला होता. या साखरपुड्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लवकरच ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. या […]Read More

मनोरंजन

प्रख्यात गझल गायक पंकज उधास यांचे निधन

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दर्दभऱ्या गझल गायकीने भारतीय कानसेनांना तृप्त करणारे ज्येष्ठ गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास हे आजारी होते. आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उधास यांनी अखेरचा श्वास घेतला. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या […]Read More

देश विदेश

या देशात बंद होणार Google Pay ॲप

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Google चे डिजिटल पेमेंट ॲप आता जगभरात लोकप्रिय झालेले आहेत. भारतीयांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांत या ॲपला अनन्यसाधारण महत्त्वप्राप्त झाले आहे. असे हे लोकप्रिय ॲप आता अमेरिकेत बंद होणार आहे. ४ जून २०२४ रोजी अमेरिकेत गुगल पे ॲप बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. याबदल्यात वापरकर्त्यांना गुगल वॉलेटचा पर्याय […]Read More

पर्यावरण

पर्यावरण संवर्धनासाठी दांपत्याने सोडली मुंबई

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वास्तुविशारद श्रीनिवास आणि त्यांची पत्नी डॉक्टर रश्मी वरखंडकर यांनी नेहमीच मुंबईतील आलिशान जीवनशैली स्वीकारली आहे. मात्र, ते आता रायगडच्या डोंगररांगांमध्ये बांबूच्या घरात राहून पर्यावरणपूरक जीवन जगण्यासाठी शेती आणि पशुपालन करत आहेत. भौतिक सुखासाठी पर्यावरणावर घाला नको. सिमेंट काँक्रीटच्या घरांवर लाखो रुपये खर्च करणेही गैर असल्याचे वास्तुविशारद श्रीनिवास मानतात. साध्या […]Read More

देश विदेश

पंतप्रधानांच्या हस्ते राज्यात पहिल्या रेल्वे स्टेशनची पायाभरणी

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईशान्य भारतातील पर्यटकांच्या अतिशय आवडीचं राज्य असलेल्या दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या सिक्किम राज्याला आता प्रथमच रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज येथे राज्यातील पहिल्या रेल्वे स्टेशनची पायभरणी केली आहे. आता सिक्कीमला जाणाऱ्या लोकांना लवकरच रेल्वेने येथे येता येणार आहे. याआधी ही सुविधा येथे नव्हती. कारण […]Read More

मराठवाडा

मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण मागे, आता साखळी उपोषण…

जालना, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपले 17 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. समाजाचे म्हणणं होतं की तुम्ही तुमचे आमरण उपोषण स्थगित करावे त्यामुळे माझं उपोषण आज मी स्थगित करतोय,या आमरण उपोषणाचं आता साखळी आंदोलनात रूपांतर करतोय असे आज मराठा आरक्षण संघर्ष नेते मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. आता रोज 4 समाज बांधव […]Read More

महिला

मुंबई लोकलमध्ये युवतीचा अश्लिल डान्स, युजर्स संतापले

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दररोज, मुंबईच्या लोकल लाखो प्रवाशांच्या प्रवासाचे साक्षीदार आहे, ज्यामुळे ते मुंबईची जीवनरेखा म्हणून ओळखले जाते. मात्र, यापैकी एका लोकलमध्ये घडलेल्या घटनेने इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. चालत्या लोकल ट्रेनमध्ये भोजपुरी गाण्यावर भडक नृत्य करताना एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नृत्यादरम्यान अनेक सहप्रवाशांनी अनुभवलेली अस्वस्थता व्हिडिओमध्ये स्पष्ट आहे, […]Read More