नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तुम्हाला पुन्हा एकदा स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी देत असून 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी दरम्यान तुम्ही सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेअंतर्गत सोन्यात गुंतवणूक करू शकता. सार्वभौम सुवर्ण रोखे (Sovereign Gold Bond) नेहमी खरेदी करता येत नाहीत, यासाठी वेळोवेळी […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर २०१९ नव्याने निर्माण झालेल्या लडाख या केंद्रशासित प्रदेशात सध्या मोठे जनआंदोलन सुरू आहे.प्रचंड थंडीच्या लाटेतही येथील नागरिक संघटीतपणे आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी आंदोलन करत आहेत.लडाखमध्ये सध्या तापमान उणे झाले असले तरी राजकीय वातावरण तापले आहे.या भागाला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली […]Read More
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज लोकसभेत सरकारी भरती परीक्षांमधील पेपरफुटी आणि चीटिंग रोखण्यासाठी ‘चीटिंग विरोधी’ विधेयक मंजूर करण्यात आले. यानुसार, परीक्षेचे पेपर लीक करण्यासाठी किंवा उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संगनमत करणाऱ्यांना मोठी शिक्षा होऊ शकते. या विधेयकानुसार, परीक्षेचे पेपर लीक करताना किंवा उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड करणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दोषी आढळल्यास […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी किंग गॅस कंपनीसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. […]Read More
अकोला, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजचा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असून इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग करण्यासाठी नेमका कोती विजेचा किती वापर होतो याची कुठलीही माहिती मिळत नाही मात्र यावर अकोल्यातील पूर्वा जामनिक आणि समीक्षा टिकार या विद्यार्थिनींनी उपाय शोधत थेट स्मार्ट इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जर वापर मीटरची निर्मिती केली असून या प्रयोगाला केंद्र सरकारच्या विज्ञान , […]Read More
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात १२ ते १९ फेब्रुवारीपर्यंत ‘स्वराज्य सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले असून १२ फेब्रुवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ तर समारोप किल्ले रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे […]Read More
अहमदनगर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत जिल्ह्यातील बेलवंडी ता. श्रीगोंदा येथील शेती महामंडळाच्या ६१८ एकर जमिनीवर एमआयडीसी उभारण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. सदर एमआयडीसीच्या आराखड्यासंदर्भात पाहणी आणि सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण करून त्या संबंधित सर्व कामे कालमर्यादेत करण्यात यावीत असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील […]Read More
मुंबई दि.6(एम एमसी न्यूज नेटवर्क) : अजून किती वर्ष सरकारच्या आश्वासनावर जगत राहायचे ? आता सहन होत नाही व सांगताही येत नाही. आता आर या पार ची लढाई करायची असे ठरवत आक्रमक झालेल्या आझाद मैदानातील बार्टीच्या विद्यार्थ्यांनी वर्षा बंगल्यावर धडक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आझाद मैदान गेटवर सर्व ताकद लावत या विद्यार्थ्यांचा प्रयत्न हाणून […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून ६ हजार किमी रस्त्यांची कामे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत काल घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे रस्ते सिमेंट कॉक्रीटचे असतील आणि यासाठी २८ हजार ५०० कोटी खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे. हायब्रिड ॲन्युईटी मॉडेल हे खाजगी क्षेत्र सहभागाचे मॉडेल असून […]Read More
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महायुती सरकारची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या सरकारचे ब्रीद आहे. राज्यात आठ हजार कोटींचा अँम्बुलन्स घोटाळा गाजतो आहे. तोपर्यंत सरकारने मोबाईल घोटाळा केला आहे. मर्जीतल्या कंपनीकडून 155 कोटी रूपयांची मोबाईल खरेदी करण्याचा सरकारचा इरादा आहे. त्याचबरोबर निवडणुका डोळ्यासमोर मतं मिळवण्यासाठी अंत्योदय योजनेतील […]Read More