Month: February 2024

करिअर

पूर्व प्राथमिक ते चौथी पर्यंतची शाळा आता सकाळी नऊ नंतर

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग भरवण्याबाबतची वेळ सकाळी नऊ किंवा नऊ नंतर ठेवावी, अशी सूचना शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आली असून तसे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विभागामार्फत अभ्यास करण्यात येऊन तसेच तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येऊन हा निर्णय […]Read More

देश विदेश

RBI कडून Repo दर जैसे थे

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने व्याजदरांबाबत निर्णय घेतला आहे. तीन दिवस चाललेल्या या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या वेळीही रेपो दर सलग सहाव्यांदा 6.5 ठेवला असल्याची माहिती दिली. यावेळी रेपो रेटमध्ये बदल होतील अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल […]Read More

ट्रेण्डिंग

न्या अजय खानविलकर बनले देशाचे पहिले लोकपाल

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर यांची देशाचे पहिले लोकपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) एरातु एस. राजीव यांची पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समितीने दक्षता आयुक्त (व्हीसी) पदासाठी निवड करण्यात आली आहे. लोकपाल सध्या न्यायमूर्ती प्रदिप कुमार मोहंती यांच्या नेतृत्वाखाली कार्यवाहक अध्यक्ष आहेत. […]Read More

देश विदेश

केंद्र सरकारने काढली श्वेतपत्रिका तर काँग्रेसने जारी केली कृष्णपत्रिका

नवी दिल्ली, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आज लोकसभेत देशाची आर्थिक स्थिती मांडणारी श्वेतपत्रिका सादर केली आहे. या श्वेतपत्रिकेत UPA सरकार आणि NDA सरकारच्या काळातील देशातील तुलनात्मक आर्थिक परिस्थिती मांडण्यात आली आहे. UPA सरकारच्या काळातील धोरण लकव्यामुळे दशकांपासून निर्माण झालेली आर्थिक आव्हाने आपण परिणामकारकपणे पेलत सातत्यपूर्ण विकास केल्याचा दावा नरेंद्र मोदी […]Read More

महानगर

मंत्रालयाच्या आवारात फोटोसेशन, रिल्स बनवण्यास बंदी

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत पुण्यातील अट्टल गुन्हेगारांचे फोटो व्हायरल झाले होते. यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. खासदार संजय राऊत यांनी या भेटीचे फोटो देखील ट्विट केले होते. त्यांनी सरकारवर गुंडाराज म्हणून टीकेची झोड उठवली होती. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र […]Read More

महानगर

विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढीत गैरकारभार

मुंबई दि.8 (एम एमसी न्यूज नेटवर्क ) : विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढीत खोटी कागदपत्रे सादर करून कर्ज वितरित करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पतपेढीचे सदस्य भालचंद्र श्रीराम खातू यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला. या करोडो रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे अध्यक्ष व संचालक मंडळांचा एकूण १५ जणांविरुद्ध […]Read More

राजकीय

पोलीस अधिकाऱ्यासह तीन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांवर आयकर छापे

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या सोबतच तीन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची बातमी असून या छाप्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत यामागे नेमके काय कारण आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा यांच्या सोबत निवृत्त सनदी अधिकारी अजोय मेहता , […]Read More

ट्रेण्डिंग

राज्यसभेच्या सहाही जागा महायुती लढविण्याच्या तयारीत

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी या महिन्यात निवडणूक होणार आहे. या सहाही जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी महायुतीने कंबर कसली असून भाजपाने त्यासाठी चौथा उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. सध्या राज्यातून निवृत्त होणाऱ्या सहा जणांमध्ये भाजपाच्या नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि मुरलीधरन यांचा समावेश आहे तर उर्वरित […]Read More

ऍग्रो

ऊसाला वाढीव प्रति टन शंभर रुपये द्या, अन्यथा तीव्र आंदोलन

कोल्हापूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन १०० रुपये द्या अन्यथा साखर सहसंचालक कार्यालयास टाळे ठोकून साखर अडवू असा इशारा ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. तातडीनं शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके यांच्याकडे करण्यात आली आहे. ज्या […]Read More

विदर्भ

पोलीस – नक्षल मध्ये उडाली चकमक,नक्षली साहित्य जप्त

गडचिरोली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्याच्या टोकावर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वांगेतुरी गावापासून ७ किमी अंतरावर पूर्व दिशेला असलेल्या हिदूर जंगल परिसरात काल पोलीस- नक्षल मध्ये चकमक उडाली, यात जवळपास तासभर चाललेल्या चकमकीत पोलीस दलाचां वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत अंधारात नक्षल पळून गेले, त्यानंतर पोलीस विभागाने चकमक घटनास्थळी […]Read More