Month: February 2024

महानगर

आमचा जीव गेल्यावर शासन निर्णय काढणार का ?

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आश्वासन नको, शासन निर्णय पाहिजे. अशी मागणी घेऊन राज्यातील आरोग्य विभागाचा कणा असणाऱ्या ७२ हजार आशा सेविका आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. भर उन्हात मैदानात सावली नसल्याने या सेविकांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. सरकार आमचा जीव गेल्यावर शासन निर्णय काढणार आहे का ? असा सवाल या आशा […]Read More

महानगर

एस टी ने टाकली कात , इलेक्ट्रिक बसचा ताफा दाखल

ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बदलत्या काळानुसार बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून आता एसटीने देखील कात टाकली आहे. इलेक्ट्रीक एसी बस या प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध झाल्या आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केलं. एसटी महामंडळाच्या electric बस चा ताफा त्यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. मागील कित्येक वर्षापासून महाराश्ट्रातील […]Read More

ऍग्रो

पीक विमा योजना अंमलबजावणी सुधारणेसाठी समिती

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी मुंडे यांच्या […]Read More

पर्यटन

गंगा नदीच्या काठी स्थित,काशी विश्वनाथ मंदिर

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काशी किंवा वाराणसी येथे गंगा नदीच्या काठी स्थित, हे मंदिर सुमारे 2500 वर्षे जुने आहे आणि ते भारतातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या बुरुजावर महाराजा रणजित सिंग यांनी दान केलेल्या ८०० किलो सोन्याचा मुलामा आहे. हे भारतातील […]Read More

महानगर

भारतातील कम्‍युनिटी  रेडिओला  20  वर्षे पूर्ण

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘जागतिक रेडिओ दिना’च्या निमित्ताने, मंत्री अनुराग सिंह ठाकूर, जे माहिती आणि प्रसारण मंत्री तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री म्हणून काम करतात, यांनी ‘भारतात कम्युनिटी रेडिओ केंद्रे स्थापन करण्यासाठी सुधारित धोरण मार्गदर्शक तत्त्वे’ जारी केली. चेन्नई येथील अण्णा विद्यापीठात आयोजित प्रादेशिक (दक्षिण) कम्युनिटी रेडिओ परिषदेदरम्यान हा प्रकार घडला. […]Read More

राजकीय

अशोक चव्हाण डरपोक, मैदान सोडून पळाले!

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अशोक चव्हाण यांना दोनवेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, आमदार, खासदार अशी विविध पदे काँग्रेस पक्षाने दिली. पक्षात नेतृत्व करण्याची संधी दिली. कालपर्यंत ते काँग्रेस पक्षात होते पण अचानक ते भारतीय जनता पक्षात गेले. अशोक चव्हाण डरपोक आहेत, ते मैदान सोडून पळाले आणि विरोधकांशी हातमिळवणी करून काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघात […]Read More

राजकीय

अशोक चव्हाण अखेर भाजपा मध्ये सामील

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज अखेर भाजपा मध्ये प्रवेश केला, २१ रुपयांची पावती फाडत त्यांनी भाजपाचे प्राथमिक सदस्य पद प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते स्वीकारले. आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नसून पक्ष नेतृत्व सांगेल त्यानुसार काम करू असे त्यांनी यावेळी माध्यमांना सांगितले. काल सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन नंतर […]Read More

ट्रेण्डिंग

अशोक चव्हाणांचे पत्ते अद्याप खुले नाहीत , तर वडेट्टीवारानी ठेवले

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : “आज मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यसमिती, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही मी राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये असताना मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. कोणाबद्दल मी तक्रार करणार नाही. वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही. पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप […]Read More

राजकीय

आप नेते मनीष सिसोदिया यांना मिळाला अंतरिम जामीन

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात जवळपास वर्षभरापासून तिहार तुरुंगात असलेले आम आदमी पक्षाचे (AAP) ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. तीन दिवसांसाठी ते तुरुंगातून बाहेर येणार आहेत. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना त्यांच्या भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी हा दिलासा देण्यात आला आहे. 13 ते […]Read More

अर्थ

सार्वभौम सुवर्ण रोखे योजना आजपासून खुली

मुबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणाऱ्यांसाठी हा आठवडा विशेष आहे. कारण आज पासून सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची नवीन मालिका खुली झाली आहे. ही योजना 5 दिवस गुंतवणुकीसाठी खुली असेल. यामध्ये प्रति ग्रॅम सोन्याचा भाव 6,263 रुपये निश्चित करण्यात आला आहे.RBI ने सांगितले की, सार्वभौम गोल्ड बाँड 2023-24 मालिका 4 […]Read More