Month: February 2024

महानगर

रेबिजमुक्तीसाठी मुंबई मनपाची विशेष मोहिम

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईतील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो.मुंबई महापालिकेकडून भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे उद्भवणाऱ्या रेबीज संक्रमणाचा धोका कमी करणे आणि श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवणे या उद्देशाने पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्पा’अंतर्गत भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत […]Read More

पर्यावरण

खवले मांजर तस्करी प्रकरणी ७ जणांना अटक

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे परिसरातील जंगल क्षेत्रामध्ये दुर्मिळ वन्यजिवांच्या प्रजाती आढळून येतात.तस्करांकडून या दुर्मिळ वन्यजिवांच्या जीवावर उठलेल्याच्या काही घटना समोर येत असून वन विभागाकडून या तस्करांवर कठोर कारवाई करण्या येत आहे. वनांच्या अन्नसाखळीतील महत्त्वूर्ण योगदान असणाऱ्या खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी जुन्नर वन विभागातील घोडेगाव वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळात मोठी कारवाई करण्यात आली आहे. […]Read More

पर्यटन

भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सिद्धिविनायक मंदिर हे गणेशाचे पवित्र मंदिर आहे आणि भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. असे मानले जाते की जीवनात कोणतीही नवीन सुरुवात करण्यापूर्वी या मंदिराचे दर्शन घेणे शुभ असते. मंदिराच्या दरवाजावर गणपतीच्या आठ ठशा कोरलेल्या आहेत. हे मंदिर लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी १८०१ साली बांधले […]Read More

देश विदेश

केंद्र सरकारने उठवली कांद्यावरील निर्यातबंदी

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशांतर्गत बाजारपेठेत शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी शेतमाल निर्यात करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र केंद्र सरकारच्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना या संधीला मुकावे लागते. गेले दोन महिन्यांपासून देशातील कांदा उत्पादक शेतकरी केंद्र सरकारने घातलेल्या निर्यांत बंदीमुळे त्रस्त झाला आहे.मात्र आता ही कांदा निर्यात बंदी उठवून केंद्र सरकारने […]Read More

ट्रेण्डिंग

१५ हजार फुटावर साकारली शिवाजी महाराजांची रांगोळी

अकोला, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदाचे वर्ष शिवराज्याभिषेकाचे साडेतीनशे वे वर्ष असून शिवजयंतीचे औचित्य साधत अकोला जिल्हयातील अकोट येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात चतुर्भुज आर्ट्सचे रांगोळी कलाकार अनिल काळे आणि श्री शिवाजी महाविद्यालयाच्या माध्यमातून तब्बल 15 हजार स्क्वेअर फुटावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्यातून दिसणारी ही 100 फूट […]Read More

विदर्भ

अमरावती जिल्ह्यात भीषण अपघातात चार मृत्यू …

अमरावती दि.१८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती नांदगाव खंडेश्वर रोडवर ट्रॅव्हलर आणि सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनचा आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू, तर 10 गंभीर जखमी झाले आहेत. क्रिकेट मॅच खेळण्यासाठी हे 14 तरुण अमरावती वरून यवतमाळ साठी जात असताना नांदगाव खंडेश्वर जवळ शिंगणापूर येथे हा अपघात झाला. जखमीना […]Read More

विदर्भ

हातमाग कापड स्पर्धेत मुरलीधर पांडुरंग निनावे विजेता

नागपूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विभागीय हातमाग कापड स्पर्धेत मुरलीधर पांडुरंग निनावे प्रथम विजेता ठरला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. विदर्भातील विणकर आपले नाविण्यपूर्ण वाणाचे प्रकार विभागीय हातमाग कापड स्पर्धेसाठी आणतात. त्या वाणांमधून समिती मार्फत 3 पारितोषिक दिले जातात. विणकरांना अनुक्रमे रक्कम 25 हजार, 20 हजार आणि 15 हजार असे […]Read More

पर्यावरण

जिल्ह्यातील वीटभट्ट्या होणार ‘सील’; इंधन म्हणून

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :देशात आज वायु प्रदूषणाचा विषय गंभीर होत आहे. दिल्लीत प्रदूषणामुळे हवेत प्रदूषणाचे थर दिसून आल्याचे पाहिले. प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण विभाग कार्यरत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी देशभरातील विटभटट्यांत वापरला जाणारा कोळसा, लाकडांचा वापर बंद करून वीट तयार करताना त्याऐवजी ‘गॅस’चा वापर करावा, असे आदेश केंद्रीय पर्यावरण, वन जलवायू परिवर्तन मंत्रालयाने काढले […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ ला जुन्नर येथे सुरुवात

पुणे, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२४’ चा शुभारंभ जुन्नर येथे करण्यात आला. १९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात उपस्थितांना राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव म्हणजे कला, संगीत, साहस आणि इतिहास […]Read More

पर्यटन

आता वसई ते भाईंदर करता येणार बोटीने प्रवास

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत वसई खाडीतील वसई ते भाईंदरला जोडणारी रो-रो प्रवासी फेरी सेवा 20 फेब्रुवारी 2024 पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. रोरो बोटीचे सुरक्षित आणि सुलभ नौकानयन, प्रवासी आणि वाहनांचे सुरळीत चढणे आणि उतरणे आणि योग्य नौकानयन मार्गाची खात्री झाल्यानंतर, फेरी सेवेचे औपचारिक उद्घाटन केले जाईल. बहुप्रतीक्षित […]Read More