नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सिताबर्डी ते खापरी अशी नागपूर मेट्रोची सफारी करून प्रवाशांशी संवाद साधला. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, संचालक अनिल कोकाटे , राजीव त्यागी तसेच सारंग गडकरी यावेळी उपस्थित होते. मेट्रो रेल्वेकडून […]Read More
नागपूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत गद्दारीच केली नसती तर भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्याकडे घेतले नसते असे मत राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज व्यक्त केले. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणूकीत भाजप सामुहिक नेतृत्व घेऊन निवडणूक लढणार […]Read More
पुणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युवा गायक रजत कुलकर्णी यांच्या अत्यंत तयारीच्या सादरीकरणाने रसिकांची भरभरून मिळवलेली दाद, हे सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या पूर्वार्धाचे वैशिष्ट्य ठरले. ज्येष्ठ गायिका पद्मा देशपांडे यांच्या परिपक्व गायनाचा आस्वादही रसिकांनी घेतला. आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मुकुंदनगर येथील […]Read More
पालघर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्र्चिम रेल्वेच्या पालघर – बोईसर रेल्वे स्थानका दरम्यान १६ आणि १७ डिसेंबर असे दोन दिवस काही तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पालघर – उमरोली दरम्यान जुना ब्रिज तोड़ण्याचं काम करण्यात येणार असल्यानं हा दोन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. १६ आणि १७ डिसेंबर ला पालघर – […]Read More
चित्रदुर्ग, कर्नाटक, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) ने कर्नाटकातील चित्रदुर्गातील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमधून स्वदेशी हाय-स्पीड फ्लाइंग-विंग मानवरहित एरियल व्हेइकल (UAV) स्वायत्त फ्लाइंग विंग टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटरची यशस्वीपणे उड्डाण चाचणी केली आहे. या स्वायत्त स्टेल्थ यूएव्हीचे यशस्वी उड्डाण प्रात्यक्षिक हे देशातील तंत्रज्ञान तयारी पातळीच्या परिपक्वतेची साक्ष आहे. टेललेस कॉन्फिगरेशनमध्ये या […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता प्रकरणाबाबत अंतिम निकाल येण्यास अक्षरश: ‘तारीख पे तारीख’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलनंब प्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात वेळ वाढवून मागितला होता. सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना दिलासा देत शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम […]Read More
नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मथुरेतल्या शाही ईदगाह मशिदीचं वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचा मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. काल यावर निकाल देताना अलाबाबाद उच्च न्यायालयाने वैज्ञानिक सर्वेक्षणास परवानगी दिली. त्यानंतर मुस्लीम पक्षकारांनी आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. तसेच सर्वोच्च […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑडीने Audi मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे भारतातील पहिल्या अल्ट्रा-फास्ट चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले आहे. चार्जझोनच्या सहकार्याने संकल्पित आणि विकसित केलेल्या, या अल्ट्रा-फास्ट चार्जरची एकूण क्षमता 450kW आहे, इलेक्ट्रिक वाहनाला 360kW पॉवर वितरीत करण्यासाठी आणि उच्च कार्यक्षमता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी 500 amps लिक्विड-कूल्ड गनद्वारे सक्षम आहे. […]Read More
मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापत झाल्यामुळे त्याला वर्ल्ड कप सामन्यांना मुकावे लागले होते. मात्र आता त्याला एक उत्तम संधी मिळाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याची निवड करण्यात आली आहे. तब्बल दशकभर मुंबईचं यशस्वी नेतृत्व करणाऱ्या रोहित […]Read More
नागपूर, दि.१५ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : म्हाडाच्या ५६ वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील सन १९९८ ते २०२१ या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. यामुळे तब्बल ३८०.४१ कोटींचा वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून या निर्णयामुळे मुंबईतील ५० हजार रहिवाशांना दिलासा मिळाला असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. मंत्री […]Read More