जालना, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचाल संजय सक्सेना जालन्यात आज दाखल झाले.मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणी चौकशीसाठी ते जालन्यात दाखल झाले आहेत. औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण हे ही बैठकीसाठी हजर होते . जालन्याचे जुने एसपी तुषार दोषी, नवीन एसपी शैलेश बलकवडे आणि पुण्याचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्यासोबत ही […]Read More
पुणे, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृष्णजन्माष्टमीचा उत्सव अगदी दोन दिवसांवर आल्यामुळे राज्यात सर्वत्र गोविंदा पथकांची जोरदार तयारी सुरु आहे. सर्वांना संघटीत करणाऱ्या या सणाच्या निमित्ताने यावर्षी एक पुरोगामी उपक्रम सुरू होत आहे. आता पुण्यामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रातील तृतीयपंथी गोविंदा पथकं तयार होत आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच तृतीय पंथीयांच गोविंदा पथक यंदाच्या दहीहंडीत सहभागी होणार […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सकाळचे हेल्दी आणि हलके जेवण सर्वांनाच आवडते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अशी काही रेसिपी शोधत असाल जी तुम्ही पटकन बनवू शकाल आणि जी चवीलाही चांगली असेल तर तुम्ही मसाला इडली नक्की करून पहा. यासाठी एक दिवस आधी इडली बनवून फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने, तुमचा सकाळचा वेळ वाचेल आणि तुम्ही […]Read More
उदयपूर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उदयपूरमध्ये अनेक व्हेंटेज पॉईंट्स आहेत परंतु तलावाच्या मध्यभागी असलेल्या विहंगम दृष्यांचा स्वतःचा एक अनोखा आकर्षण आहे. होय, आम्ही पिचोला तलावाबद्दल बोलत आहोत, एक कृत्रिम गोड्या पाण्याचे सरोवर जे 14 व्या शतकातील आहे. संध्याकाळच्या वेळी घाट, मंदिरे आणि हवेल्या किनाऱ्यावर चमकत असल्याने तलावाच्या सौम्य प्रवाहांवरून संध्याकाळची बोट क्रूझ ही उदयपूरमधील […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरू झालेली असताना मुंबईतील सर्वांत श्रीमंत गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या GSB गणपती मंडळाने मोठ्या रक्कमेचा विमा काढण्याची प्रथा कायम ठेवत यावर्षी तब्बल ३६० कोटी ४० लाखांचा विमा काढला आहे. किंग सर्कल येथील गौड सारस्वत ब्राह्मण (जीएसबी) सेवा मंडळाच्या या बाप्पाच्या दर्शनाला दरवर्षी लाखो भाविक […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतातील सर्वांत महागडे वकील म्हणून ख्याती असलेले माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी आज तिसरा विवाह केला आहे. ६८ वर्षीय साळवे यांनी लंडनमध्ये ब्रिटीश महिला ट्रिना यांच्याशी विवाह केला. या लग्न समारंभासाठी उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी, आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी, सुनील मित्तल, एलएन […]Read More
मुंबई,दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या एका महिन्यात टाटा पॉवरच्या शेअरच्या किमती ११ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. तर, सहा महिन्यांत शेअरच्या वाढीचा दर २३ टक्क्यांहून अधिक आहे.याला कारणीभूत ठरला आहे हरित ऊर्जा निर्मितीशी संबंधित एक करार. टाटा पॉवरच्या शेअरमध्ये तुफान तेजी आली आहे.टाटा पॉवरनं मोटेल हॉटेल्ससोबत ६ मेगा वॅटच्या एसी प्रकल्पासाठी करार केला आहे. […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘माझी माती माझा देश’ अभियान अंतर्गत ‘अमृत कलश’ यात्रा कर्तव्य भावनेतून यशस्वी करा. या यात्रेतून राज्यातील प्रत्येक कुटुंबात,घरा-घरात राष्ट्रभक्तीचे भावना जागृत होईल असे नियोजन करण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपासाठी आयोजित नवी दिल्लीतील कार्यक्रमासाठी यात ग्रामीण भागातून ३५१ […]Read More
मुंबई दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामी सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. मराठा आरक्षण आणि समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे […]Read More
सिंधुदुर्ग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षक दिनाच्या या परिसंवादात केवळ औपचारिक शिक्षणावर चर्चा न करता लोकशाही मूल्ये रुजवणारे सर्वागीण शिक्षण आणि ते शिक्षण देणारे विविध क्षेत्रांतील शिक्षक यांवर ऊहापोह केला जाणार आहे, अशी माहिती कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. शाळा कॉलेज मधील मुलांना मतदान […]Read More