Month: September 2023

विदर्भ

‘हुमणी’ अळीचा सोयाबीन, तूर, कपाशीवर प्रादुर्भाव …

बुलडाणा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यावर्षी पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच हवामान बदलामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. मागील काही दिवसांपासून सोयाबीन पिकांवर हुमणी अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवर हुमणी, खोडकिडी या किडीचा तसेच विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोगाचा, तर कपाशीवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून आला […]Read More

मराठवाडा

दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनआक्रोश मोर्चा

बीड, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईत जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली ,मुख्य मार्गाने हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात असलेली बैलगाडी मोर्चाचे आकर्षण ठरली. दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना सरसकट 1 लाख रूपये मदत करावी,100 टक्के पीक […]Read More

विदर्भ

स्‍वच्‍छ वायू सर्वेक्षण स्‍पर्धेत अमरावती भारतातून प्रथम…

अमरावती दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण भारतामध्ये NCAP (नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम ) अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती महानगरपालिकेचा देशात प्रथम क्रमांक आलेला आहे. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने या संबंधीचे सर्वेक्षण देशातील विविध 94 शहरांमधे केले होते. यामध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्येचे शहर या वर्गवारीत अमरावती महानगरपालिकेने बाजी मारून शिरपेचात […]Read More

ऍग्रो

प्रथमच शेतकऱ्यांना केळी पिकावरील रोगासाठी नुकसानभरपाई

मुंबई, दि.५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगांव जिल्ह्यातील २७४ गावांतील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकांचे सन २०२२ मध्ये सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझंक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाल्यामुळे त्यांना नुकसानापोटी १९ कोटी ७३ लक्ष रुपये एवढ्या मदतीचे वितरण करण्याचे आदेश मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. […]Read More

खान्देश

इंडिया आघाडीचं नाव हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही

जळगाव, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधाला. यावेळी त्यांनी जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जसह राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही भाष्य केले. तर यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना केंद्र सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांच्या इंडिया आघाडीचे नाव बदलले जाणार असल्याची चर्चा आहे यावर मत विचारले असता शरद […]Read More

राजकीय

शरद पवार म्हणाले 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज

जळगाव, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देश पातळीवर सामाजिक आरक्षणाची मर्यादा 50 टक्के होऊन वाढवून 65 टक्के केल्यास मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो परंतू तसे केंद्रातलं भाजप सरकार करत नाही असा थेट हल्लाबोल पवार यांनी केंद्र सरकारवर केला. आरक्षणासाठी शांतीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर लाठी हल्ला नेमका कोणाच्या आदेशावरून झाला हे सरकारने […]Read More

पर्यावरण

ऐकूयात मातीची हाक!

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  “तो ओला कचरा कोरड्या कचऱ्याबरोबर एकत्र नको करूस. ओल्या कचऱ्याचे खत करतो आपण. भरपूरखत तयार झालं, की, आपल्या झाडांना घालायचं आणि राहिलेलं जवळच्या शेतकऱ्यांना द्यायचं.” Don’tmix that wet waste with dry waste. We make organic fertilizer from it. Then we usefor our Read More

कोकण

कोकणातील आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई आणि टास्कफोर्सही

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये कोकणात आंब्याचे नुकसान झाल्यामुळे तीन महिन्याची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी सुमारे साडेआठ कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही लगेच सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. याशिवाय आंब्याचे घटणारे उत्पादन, किडीमुळे होणारे नुकसान याबाबतीत कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक […]Read More

Uncategorized

मुंबई  खरंच बुडणार आहे का ?

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  “येत्या तीसेक वर्षात मुंबई बुडणार म्हणे? खरंच?”Really, Mumbai is going to sink in next 30 years?  “हो.” Yes. “कशी काय?”How so?  “अमेरिकेने दुसऱ्यामहायुद्धात हिरोशिमाRead More

Uncategorized

आगळीवेगळी स्पर्धा, साहित्ययात्री 2023

डोंबिवली येथील ‘ध्रुव नॉलेज वेल्फेअर सोसायटी’ ने रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी डोंबिवलीतील टिळक नगर शाळेच्या पेंढरकर सभागृहात ‘साहित्ययात्री २०२३’ ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित केली होती. वाचकांच्या मराठी साहित्यविषयक ज्ञानाचा कस पाहणारी ही प्रश्न मंजुषा होती. यामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरातील सहा स्पर्धक गटांनी सहभाग घेतला. सुमारे तीन तास चाललेल्या या स्पर्धेत, पुस्तकं, साहित्यिक, साहित्यिकांनी निर्मिलेली […]Read More