Month: May 2023

राजकीय

संसदेच्या उद्घाटन वादावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होऊ नये, ते राष्ट्रपतींच्या नावे व्हावे, असा आग्रह धरत देशभर विरोधी पक्षांनी भाजपला वेठीस धरले असताना हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही प्रविष्ट होऊ घातले होते. मात्र नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याची मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावत […]Read More

ट्रेण्डिंग

अंध पाहू शकतील, अर्धांगवायूग्रस्तांचे आयुष्य सुसह्य होईल असे अत्याधुनिक संशोधन

टेक्सास, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क आता मानवी आयुष्य अधिकाधीक सुसह्य करून शारीरिक अपंगत्व आलेल्यांचे आयुष्य सुकर करणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांच्या ब्रेन-चिप कंपनीला न्यूरालिंकला मानवी चाचण्यांसाठी यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (FDA) कडून मंजुरी मिळाली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास अंधांनाही चिपद्वारे पाहता येणार आहे. अर्धांगवायूचा त्रास […]Read More

मराठवाडा

श्री तुळजाभवानीची सिंहासन पूजा ऑनलाईन नोंदणी

तुळजापूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात. श्री देवीजींची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंहासन पूजा ऑनलाईन पध्दतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर http://shrituljabhavani.org प्रत्येक महिन्याच्या […]Read More

महिला

पथनाट्यातून मासिक पाळीच्या आरोग्याची जनजागृती

पुणे दि २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मासिक पाळीभोवतीचा कलंक पुसण्यासह मासिक पाळीचे आरोग्य, स्वच्छता याबद्दल मोकळेपणाने संभाषण याविषयी जनजागृती करणाऱ्या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. उद्या जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा होत असताना आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम ‘उजास’ने पुण्यात प्रभावी पथनाट्याचे सादरीकरण केले. ‘ब्रेकिंग द सायलेन्स : लेट्स नॉर्मलाईज पीरियड्स’ या शीर्षकाचे […]Read More

सांस्कृतिक

राज्यातील गडकिल्ल्यांच्या रक्षणाचे अभियान सुरु करा

मुंबई दि २६, एमएमसी न्यूज नेटवर्क: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक आहेत. राज्याची ओळख व अस्तित्व शिवाजी महाराजांमुळे आहे, असे सांगताना ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्याने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट तयार करण्याची योजना हाती घ्यावी अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज केली.राज्यातीलगडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी देखील अभियान सुरु करावे असे आवाहन राज्यपालांनी […]Read More

विदर्भ

नागपुरात अनुभवता आला शून्य सावलीचा दिवस

नागपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावलोपावली सोबत असणारी आपली सावली वर्षातून दोन दिवस आपली साथ सोडते आणि आज तोच दिवस आहे आज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी ते चित्र नागपुरातील रामण विज्ञान केंद्रामध्ये पहायला मिळालं. विदर्भातील इतर जिल्ह्यातही ही स्थिती निर्माण होणार असली तरी अक्षाऊंश रेखांश नुसार दिवस वेगळे राहणार आहेत. सूर्य डोक्यावर आल्यानंतर ठराविक […]Read More

ट्रेण्डिंग

पुढील पाच दिवसात तापमान घट

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात आता नैऋत्य मौसमी पावसाची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. यावर्षी राज्यात दरवर्षीपेक्षा साधारणपणे एक आठवडा उशीराने मान्सून येणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मान्सूनच्या अनुषंगाने येत्या पाच दिवसात राज्यातील तापमानात लक्षणीय घट दिसून येणार आहे. गेले काही दिवसांपासून वाढलेल्या उकाडय़ापासून आता दिलासा मिळणार आहे. राज्यातील कमाल तापमानात […]Read More

महानगर

झोपडीवासियांना आता अडीच लाखात घर

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील झोपडी धारकांसाठी राज्य सरकराने मोठी भेट दिली आहे. १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ या काळातील झोपडी धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. झोपडी धारकांना झोपडच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार आहे. गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. शासन निर्णय जारी झाल्याने लाखो कुटुंबियांचं घराचं […]Read More

करिअर

पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्या

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या राज्यातील हजारो मुला-मुलींसाठी मुंबईतील ७ मे २०२३ रोजीची पोलीस भरती परिक्षा ही एक मोठी संधी होती. परंतु या पोलीस भरतीमध्ये अनुचित प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. या परिक्षेत मोठ्या प्रमाणात हायटेक कॉपी करण्यात आली. कमी मार्क असलेल्या मुलांना पात्र ठरवण्यात आले, यासह भरतीसाठी मुलांकडून […]Read More

Uncategorized

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारला अनास्था

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष संपायला आले तरी सरकार हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृत महोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे. या कार्यक्रमासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही मंत्रीमंडळ उपसमितीने अद्यापी कार्यक्रम आराखड्यास मंजूरीच दिलेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने […]Read More