चंद्रपूर दि २७ :चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील वाघोली-बुटी गाव परिसरात धुमाकूळ घालणारी वाघिण अखेर जेरबंद झाली आहे. तीने गेल्या 20 दिवसात 2 ग्रामस्थाना ठार केले होते. गावात येऊन ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या वाघिणीला ठार करा अशी ग्रामस्थांची मागणी होती. वनविभागाने सुमारे 50 ट्रॅप कॅमेरे आणि 100 कर्मचाऱ्यांसह चालविली वाघिणीसाठी शोधमोहीम राबविली होती. अखेर विविध जागी लावलेल्या पिंजऱ्यापैकी व्याहाड खुर्द […]Read More
जालना, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील ४ राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलंय. ज्यावेळी या कायद्याचा मसुदा तयार होऊन जनतेसमोर ठेवला जाईल त्यावेळी यावर भाष्य केले जाईल असं दानवे यांनी सांगितलं. ते जालन्यातील बदनापूरमध्ये बोलत होते. उद्या नवीन संसदेचं उदघाटन होत […]Read More
चंद्रपूर, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरासाठी चंद्रपूरच्या सागवान लाकडाची चौकट मिळाली आहे. भारतीय संसदेच्या नव्या इमारतीसाठी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सागवान लाकडाचा पुरवठा करण्यात आलाय. अशा प्रकारे नव्या संसद भवनाशी चंद्रपूरचे अनोखे काष्ठबंध तयार झालेत. राज्याच्या वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर विभागाने यासाठी ऑगस्ट 2021 पासून 800 घनमीटर सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे लाकूड नवी दिल्लीला रवाना […]Read More
नवी दिल्ली २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने राष्ट्रीय आरोग्य अभियान मिशन कार्यक्रम अंमलबजावणी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी पुरवणी निधी मंजूर करण्यात आला असुन आर्थिक वर्ष 2022-23 साठी रु. 652.13 कोटी रुपये तर आर्थिक वर्ष 2023-24 साठी एकूण रु. 1618.54 कोटी रुपयांच्या अशा रु. 2270 कोटींच्या पुरवणी निधीला केंद्र सरकार मार्फत मंजूरी देण्यात […]Read More
मुंबई, दि. 27 (जितेश सावंत) : बाजाराने मागील आठवड्यातील तोटा पुसून टाकत पाच महिन्यांचा उच्चांक गाठला.यूएस कर्ज मर्यादा चर्चा सुरु असल्याने जागतिक बाजारात अस्थिरता असून देखील बाजाराने उच्चांक गाठला.विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा पाठिंबा,चांगले तिमाही निकाल तसेचसामान्य मान्सूनची अपेक्षा या जोरावर बाजार वधारला.निफ्टीने 18,500 चा स्तर गाठला. शुक्रवारी अमेरिकन बाजार वाढीसह बंद झाले.युरोपीय बाजारातही तेजी दिसून आली. […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी एक आनंदवार्ता दिली. विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून सामान्य राहील. तो येत्या 4 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. 18-19 मेच्या दरम्यान मान्यून अंदमानमध्ये दाखल झाला. त्यानंतर मान्सून केरळमध्ये उशिरा येईल अशी चर्चा होती. मात्र आता हवामान विभागाने मान्सूनबाबत मोठी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना मोठा […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) ओटीटी विश्वाने त्यांचा बराच मोठा चाहतावर्ग कमी वेळात निर्माण केला आहे. उत्तमोत्तम आणि खिळवून ठेवणारा कन्टेन्ट हे त्यामागचे कारण मानले जाते. अशाच उत्कंठावर्धक मालिकांपैकी ज्या काही मालिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे, त्यातील एक म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्स. या मालिकेचा आता तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही […]Read More
मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महत्वाची बैठक बोलावली आहे. टिळक भवन या पक्ष कार्यालयात २ व ३ जून रोजी लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला राज्यातील सर्व प्रमुख नेते व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रत्येक मतदारसंघाचा सर्वबाजूने विचार केला जाणार […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज खासगी क्षेत्रातील नोकरदारांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे निवृत्त होणाऱ्या वा नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणाऱ्या रोखीवर कर सवलत मिळेल. रजा अर्जित करुन जी रोख कमाई होईल. त्यावर ही मर्यादा वाढविल्याने कोणताच कर द्यावा लागणार नाही. सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना […]Read More
नवी दिल्ली, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावरून वाढत चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 25 पक्षांनी सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. हे सर्व 25 पक्ष संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात सहभागी होणार आहेत. यापैकी 7 पक्ष सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग नाहीत. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार […]Read More