पुणे, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय असलेले आरोपी DRDO शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना पुण्यातील ATS कार्यालयात तपासासाठी आणण्यात आले आहे. दहशतवादी विरोधी पथकाने कारवाई करत त्यांना काल अटक केली आहे. डीआरडीओचे संचालक हे पाकिस्तानच्या इंटेलिजन्सच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेशनमध्ये सहभागी होऊन त्यांनी पाकिस्तानला माहिती […]Read More
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्या प्रदर्शित होत असलेल्या ‘द केरळ स्टोरी’ या वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. द केरळ स्टोरी’या चित्रपटाविरोधात जमियत उलेमा-ए-हिंदच्या वकिलांनी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र जमियतच्या सीबीएफसी प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पवई येथील हॉटेल वेस्टिनमध्ये 3 ते 5 मे 2023 या कालावधीत फिक्की फ्रेम्सच्या 23 व्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले, ” प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन उद्योग यांना जागतिक दर्जा गाठता यावा यासाठी, सरकारला त्यांचा प्रोत्साहक आणि पाठिराखा […]Read More
पाटणा, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाटणा उच्च न्यायालयाने आज बिहारमधील जातनिहाय जनगणनेला स्थगिती दिली आहे. मुख्य न्यायाधीश विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने ही जनगणना तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी या प्रकरणावर दोन दिवस उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आतापर्यंत गोळा केलेला डेटा नष्ट करू नये, असे उच्च न्यायालयाने […]Read More
उल्हासनगर, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण राज्यात “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” या योजने अंतर्गत ३१७ दवाखाने सुरु केले आहेत . मात्र त्यांच्याच जिल्ह्यात असलेल्या उल्हासनगर शहरातील शासकीय रुग्णालयात काही विभागात वीज खंडीत होत असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उल्हासनगरात मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात काही […]Read More
बेळगाव, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बजरंग दलसारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. बेळगाव येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीत मी बेळगाव येथे प्रचाराला आलो होतो. विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, […]Read More
नवी दिल्ली, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राउरकेला, ओडिशा येथे गुरुवार, 4 मे 2023 रोजी सुरू होणार्या प्रतिष्ठित 13 व्या हॉकी इंडिया सब-ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2023 मध्ये भाग घेण्यासाठी भारतभरातील इच्छुक युवा हॉकी खेळाडूंसाठी स्टेज तयार करण्यात आला आहे. 14 मे 2023 रोजी खेळल्या जाणार्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासह एकूण 11 दिवस चालणार्या स्पर्धेत 28 […]Read More
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पक्ष कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तीव्र भावनांचा आपण आदर करतो मात्र पक्ष हितासाठीच आपण पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे अशी भूमिका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मांडली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे दोन दिवसांपासून धरणे धरून बसलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पवार यांनी हे वक्तव्य केले. आपण कोणालाही न विचारता हा निर्णय […]Read More
पुणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): यावर्षीच्या हंगामात १०५२.८८ लाख टन इतक्या ऊसाचे गाळप होऊन त्यातून १०५.३१ लाख टन इतक्या साखरेचे उत्पादन झालेले आहे. तर साखर निर्यातीतून राज्यातील साखर कारखान्यांना 8740 कोटी रुपये मिळाले आहेत. राज्यातील सात सहकारी साखर कारखान्यांनी सर्वात जास्त ऊसाचे गाळप केले आहेत, यात तीन खाजगी साखर कारखान्यांचाही समावेश आहे. तर राज्यात कोल्हापुरातील […]Read More