Month: May 2023

शिक्षण

राज्यातील सरकारी शाळांसाठी ‘एक रंग – एक गणवेश’ धोरण जाहीर

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात ‘एक रंग – एक गणवेश’ हे धोरण नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. याच वर्षापासून हे धोरण लागू होणार आहे. सर्व सरकारी शाळांमध्ये एकाच रंगाचा गणवेश असेल. मात्र, ज्या शाळांनी या निर्णयापूर्वी कपड्यांच्या ऑर्डर दिल्या आहेत, तिथे […]Read More

करिअर

UPSC परीक्षेत ठाण्याची कश्मिरा संखे महाराष्ट्रात पहिली

ठाणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संघ लोकसेवा आयोगाचा (UPSC) २०२२ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये ठाण्याची कश्मिरा संखे हीनं महाराष्ट्रातून पहिला येण्याचा मान पटकावला आहे. तर रिचा कुलकर्णी हीनं राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे ऑल इंडिया पहिल्या चार रँकमध्ये देखील मुलींनीच बाजी मारली […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

गर्दी होणाऱ्या मंदिरांचे आता डिजिटल मॅपींग

मुंबई, दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील ज्या मंदिर, देवस्थानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते त्यांचे डिजिटल मॅपींग करण्यात यावे , जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. […]Read More

विदर्भ

कंटेनर आणि बसचा भीषण अपघात 6 ठार , 23 जण

बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जुन्या नागपूर मुंबई महामार्गावरील बुलडाणा जिल्ह्यातील सिदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथे एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात होऊन सहा जण ठार तर 23 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. अपघात आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडला. बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर मुंबई महामार्गावरील सिंदखेड राजा तालुक्यातील पळसखेड चक्का […]Read More

ऍग्रो

बेदाणा उत्पादन शेतकऱ्यांचे पैसे आता 21 दिवसात …

सांगली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना 21 दिवसात पेमेंट देण्याचा निर्णय सांगली मध्ये पार पडलेल्या बैठकीत झाला आहे.तसेच बेदाण्याचे पेमेंट 21 दिवसात न दिल्यास दोन टक्के व्याज आणि बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे देण्याचे भूमिका बेदाणा व्यापाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना,जिल्हा उपनिबंधक आणि बेदाणा व्यापारयांच्यामध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय […]Read More

ऍग्रो

यंदाची आषाढी वारी, हरित वारी- स्वच्छ वारी….

पंढरपूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीसाठीची प्रशासकीय बैठक आज पंढरपुरात संपन्न झाली. हरित वारी, स्वच्छ वारी या संकल्पनेवर यंदाच्या वारीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सुखकर व सुरक्षा संपन्न वारी पूर्ण करण्यासाठी सज्ज राहील. 29 जून रोजी आषाढी एकादशीचा सोहळा होत आहे, 22 जून रोजी प्रमुख मानाच्या संतांच्या […]Read More

महानगर

आदिवासी बांधव धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर….

ठाणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यलयावर धडक मोर्चाचे आयोजन केले होते. वर्षानुवर्षे आदिवासी आपल्या हक्काच्या जमिनी आपल्या नावांवर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र ते बाजूला राहिले उलट वनविभागाच्या वतीने राहती घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्याचा आरोप आदीवासी बांधवांनी केला. जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी,मुरबाड,ठाणे, कल्याण,अंबरनाथ या […]Read More

Uncategorized

पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव

*पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव* सातारा दि. २२ – महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली. महाबळेश्वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर […]Read More

महानगर

समीर वानखेडे यांना 8 जूनपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी झोन डायरेक्टर समीर वानखेडे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून पर्यत दिलासा दिला. याचवेळी मीडिया ट्रायल होऊ नये याची दक्षता घेण्याचे कडक निर्देश न्यायालयाने दिले आहेत.समीर वानखेडे यांच्याकडे ‘एनसीबी’च्या मुंबई विभागीय संचालकपदाची जबाबदारी असताना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रूझवर […]Read More

Uncategorized

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज दुपारी सव्वा बारा वाजल्यापासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे. IL & FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवत आहे. आज चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने जयंत पाटील यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी ईडी कार्यालयात हजेरी […]Read More